माथेरानमध्ये शिवसेनाप्रमुखाची कार्यकर्त्याशी शाब्दिक चकमक


माथेरान | वार्ताहर |

माथेरान नगरपालिकेतील राजकीय सत्तांतराचे पडसाद आता पक्षसंघटनेतही उमटू लागले आहेत.शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांची आता शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांसमोर शाब्दिक चकमक झडू लागल्याने शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.

माथेरान मधील शिवसेनेच्या एकूण दहा नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर माथेरान मधील एकंदरीत राजकीय वातावरण गरम झाले आहे.त्यामुळे माथेरान शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी हे अत्यंत अस्वस्थ झाले असून  हे पक्ष प्रवेशाचे वातावरण अद्याप शांत होत नाही तर चंद्रकांत चौधरी यांनी शिवसेनेचे नगरसेवक नरेश काळे यांच्या भावाला तुम्ही नवीन गाडी खरेदी केली आहे ह्याच कारणास्तव आमचे सगळे निष्ठावंत नगरसेवक पदाधिकारी अन्य पक्षात गेले आहेत केवळ चार वर्षांत नरेश काळे यांनी पक्षाच्या अन्य नगरसेवकांना मागे टाकत स्वतःचा सर्वांगिण विकास केला आहे त्यामुळेच शिवसेनेचे दहा नगरसेवक पदाधिकारी भाजप मध्ये गेले आहेत यास सर्वतोपरी तुमचे बंधू नरेश काळे हेच जबाबदार आहेत असे चंद्रकांत चौधरी यांनी काळे यांचे बंधू राजेश काळे यांना सुनावले यातूनच या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि राजेश काळे यांनी थेट पोलीस ठाण्यात चौधरी यांच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे.

शिवसेनेतील निष्ठावंत सदस्य अन्य पक्षात ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुसर्‍या पक्षात जात आहेत आणि इथे पक्षातील मंडळी आपसात अंतर्गत हेवेदावे करीत आहेत सध्या तरी जे नगरसेवक पक्षात ठाम आहेत त्यांची विचारपूस सुध्दा केली जात नसून जर असेच वातावरण यापुढेही राहिले तर शिवसेनेला आगामी निवडणूक काळात नक्कीच धोक्याची घंटा असणार आहे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

Exit mobile version