। रेवदंडा। प्रतिनिधी ।
इराण-अमेरिका-इस्त्रायल युध्दाचा भडका उडाल्याने, गॅसची कृत्रिम टंचाई सर्वत्र निर्माण झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण होईल, या भीतीने ग्राहक सिलिंडर घेण्यासाठी त्रागा करत आहेत. अनेकांनी घरामध्ये एकास एक गॅस सिलिंडरचा साठा करण्यावर भर दिल्याचे समजते. त्यामुळे गॅस एजन्सीच्या वाहनांची घरगुती गॅस सिलिंडरचे ग्राहक गावोगावाच्या वेशीवर गॅस सिलिंडरच्या वाहनाची वाट पहातानाचे चित्र दिसत आहे. घरगुती गॅस सिलिंडर विक्रेत्यांचे वाहन गावाच्या वेशीवर येताच ग्राहकांची वाहनाभोवती गर्दी दिसते. सध्या घरगुती गॅस सिलिंडर ही प्रत्येकाच्या घरात गरजेची गोष्ट आहे. अनेक कुंटूबे या घरगुती सिलिंडरवर अंवलबून आहेत. त्यामुळे घरगुती गॅसच्या कृत्रिम टंचाईच्या विचाराने गृहिणींमध्ये काळजीचा सूर उमटत आहे. सध्यस्थितीत मुरूड तालुक्यात गावोगावी घरगुती गॅस सिलिंडरची मागणी वाढली असून गावाच्या वेशीवर ग्राहकांची लगभग दिसून येत आहे.







