मुस्लिमांकडून हिंदु बांधवाचे अंत्यसंस्कार

रायगड

 पनवेल,वार्ताहर

 कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळे वाईट अनुभव येत असताना  पनवेलमध्ये  एका  कोरोनाबाधित  रुग्णावर एका मुस्लिम बांधवाने जीवाची पर्वा न करता हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करुन समाजापुढे एकोप्याचा नवा संदेशच दिला आहे. पनवेल येथे राहणारे व खारघर येथे व्यवसाय करणारे सैय्यद खान लकी तवा हॉटेल हिरानंदानी खारघर यांना व खारघर पोलीस ठाण्याचे वपोनि शत्रुघ्न माळी यांना माहिती मिळाली की, त्यांचे एक मित्र व त्याचे मेव्हुणे हे कोरोनाग्रस्त असून ते हॉस्पिटलमध्ये आहेत व त्यांचे सासरे हे कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. अशावेळी अंत्यसंस्कार करणार कोण? हा प्रश्‍न निर्माण झाला असता सय्यद खान यांनी पुढे येवून अंत्यविधी मी करतो असे सांगून पुढील व्यवस्था त्यांनी त्यांचे मित्र वपोनि शत्रुघ्न माळी, विजय पानवाला, सुफी भाई आदींच्या साथीने करून अंत्यविधी पार पाडला

Exit mobile version