राष्ट्रवादीचे आ.बनसोडेंवर भरदिवसा गोळीबार

पुणे

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

 पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर दुपारी दीडच्या सुमारास गोळीबार झाला आहे. ठेकेदारीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती सध्या समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. अण्णा बनसोडे देखील या गोळीबारातून वाचले आहेत.

 अण्णा बनसोडे यांनी दोन मुलांना मदतीच्या हेतूने कामाला लावं असे अँथनी नावाच्या ठेकेदाराला सांगितले होते. परंतु अण्णा बनसोडेचे न एकता अँथनीने  अरेरावीची उत्तरे दिली. सकाळी अँथनी सोबत त्याचा मेव्हणा देखील आला होता. त्यावेळेस त्याने त्याची बंदूक काढली आणि व्यक्तीनं गोळीबार केला.सुदैवाने कोणीही या गोळीबारात जखमी झालेले नाही. मात्र, या प्रकरणामागे नेमकं काय आहे हे पोलिसांना तपासणी दरम्यान समोर येईल. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version