। पेण । प्रतिनिधी ।
सरकारी कार्यालयात एखादे काम घेऊन गेलेल्या सामान्य नागरिकांना अनेकदा विलंब आणि अनावश्यक अडवणुकीचा सामना करावा लागतो. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगले वेतन मिळत असतानाही काही जणांकडून आर्थिक फायद्यासाठी नागरिकांकडे पैशांची मागणी होत असल्याच्या घटना समोर येत असतात. अशाच एका प्रकरणामुळे पेणमध्ये खळबळ उडाली आहे. पेण येथील लोकसेवक तथा दुय्यम निबंधक कार्यालयातील एका अधिकाऱ्याला नोंदणी प्रक्रियेच्या संदर्भात 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईमुळे सरकारी कार्यालयांतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सामान्य नागरिकांची शासकीय कामे परदर्शकपणे आणि वेळेत
पूर्ण होणे अपेक्षित असताना, अशा घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रनचिन्ह निर्माण होत आहे.






