विश्‍वासार्हता असल्याने रुक्मिणी बँकेची प्रगती-सुनेत्रा पवार

। पंढरपूर । प्रतिनिधी ।

रुक्मिणी बँकेबाबत विश्‍वासार्हता असल्याने कोरोना काळात,संकटातही चांगली सेवा दिल्याने शेअर्स ,ठेवीमध्ये वाढ झाली आहे या वर्षात बँकेने 53 लाख एवढा नफा मिळविला आहे. अशी माहिती रुक्मिणी बँकेच्या चेअरमन सौ सुनेत्रा पवार यांनी बँकेच्या25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली,अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली.यावेळी मार्गदर्शक विजयसिंह पवार, व्हा चेअरमन रवींद्र साळुंखे, संचालक नवनाथ तांबवे,सुनंजय पवार,तज्ञ संचालक मीनल पवार,दत्तात्रय निंबाळकर,डॉ भीमराव पाटील,नंदिनी गायकवाड,जयश्री शेजवळ, सुभद्रा पांढरे,ऍड महेश काळे,मीनाक्षी भोसले उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाल्या कोरोना महामारीमुळे उद्योग, व्यवसाय अडचणीत आले समाजघटकांवर विपरीत परिणाम झाले,तरीही संकटातही बँकेने कामकाज चांगले चालविले,कर्जदारांना 2टक्के सवलत दिली,वसुली अधिकारी व कर्मचारी यांनी जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,बँकेचे व्यवस्थापक विनोद आदमीले यांनी अहवाल वाचन केले.सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा 1हजार1रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेबचौगुले,पांडुरंग चव्हाण, रवींद्र मोरे,संतोष कुंभार, बाळासाहेब निंबाळकर, प्रशांत खांडेकर,बबलू जुमाळ, राहुल ननवरे,नितीन सलगर यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version