| बोर्लीपंचतन | वार्ताहार |
मे महिन्यातच अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यातुनच जुन महीन्यात पावसाचा थांबा बघुन शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, पेरणी केलेल्या दाढीतील भात शेतमातीतुन बाहेर येण्या आधीच पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने काही ठिकाणी पेरणी केलेला भात कुजला असून, काही ठिकाणी भात वाहुन गेला आहे. येथील शेतजमीनींवर होत असलेल्या भरावांमुळे योग्य प्रकारे पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होण्याची भिती वर्तवली जात आहे. त्यामुळे बोर्लीपंचतन परिसरातील बोर्लीपंचतन, दिवेआगर कापोली, शिस्ते, वेळास, वडवली, गोंडघर, आदगाव कुठलाही, हारवीत या परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातारण पसरले आहे.