श्रद्धा हॉटेल ते चारफाटा रस्त्याचे भूमिपूजन


कर्जत | प्रतिनिधी |

श्रद्धा हॉटेल ते चारफाटा हा रस्त्या काहीं ना काही तांत्रिक कारणांमुळे अनेक महिने रखडलेला होता. एम एम आर डी ए च्या माध्यमातून 4 कोटी 95 लाख रुपये खर्च करून हा रस्ता होणार आहे. या एकाच रस्त्याला दोन नावाने मंजुरी मिळाल्याने हे काम रखडले होते. त्यांनतर हा रस्ता होण्यासाठी उपोषणे सुद्धा करण्यात आली होती. आज या रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने खर्‍या अर्थाने या भागातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे.
भिसेगाव मधील श्रद्धा हॉटेल नजीक भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते श्रद्धा हॉटेल ते चारफाटा रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, सभापती सुषमा ठाकरे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, शिवसेना विधानसभा संघटक संतोष भोईर, उप जिल्हाप्रमुख भाई गायकर, पाणी पुरवठा समिती सभापती राहुल डाळिंबकर, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, माजी तालुका प्रमुख संभाजी जगताप, सरपंच प्रमिला बोराडे, नगरसेवक नितीन सावंत, बळवंत घुमरे, संतोष भासे, नगरसेविका संचिता पाटील, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, स्वामीनी मांजरे, वैशाली मोरे, शिवराम बदे आदी उपस्थित होते. माजी नगरसेविका यमुताई विचारे आणि शरद हजारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Exit mobile version