समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर

। पंढरपूर । प्रतिनिधी ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भा ज पा कडून दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री समाधान आवताडे हे  रिंगणात उतरणार आहे, असे अधिकृत वृत्त  आहे.

यामुळे समाधान आवताडे, भगीरथ भालके,शैला गोडसे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आला नाही परंतु भगीरथ भालके यांना  ती मिळणार असे जवळपास निश्‍चित आहे,मात्र अधिकृत घोषणा झाली नसल्याने यात बदल होऊ शकतात. मागील आठवड्यात भा ज पा कडून पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती, यात प्रवक्ते बाळाभाऊ भेगडे यांनी संभाव्य उमेदवारांची घोषणा केली होती. यात आ. प्रशांत परिचारक, समाधान आवताडे,अभिजीत पाटील,प्राचार्य बी पी रोंगे यांपैकी एका उमेदवाराची निवड होणार असे सांगण्यात आले होते. उद्योजक समाधान आवताडे यांनी दोन विधानसभा निवडणुकीत चांगली टक्कर दिली होती .2014साली शिवसेनेकडून तर 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणुकीत तिन्ही उमेदवार चमत्कार घडवू शकतात,यामुळे भगीरथ भालके यांच्यासाठी सुरुवातीला सोपी वाटणारी लढत अटीतटीची असणार आहे, विठ्ठल परिवारातील नाराजी,राष्ट्रवादी काँग्रेस मधील गटबाजी, मंगळवेढा तालुक्यातील भूमीपुत्राचा मुद्दा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वतंत्र उमेदवार, धनगर समाजाची नाराजी,अशा अनेक बदललेल्या राजकीय समीकरणामुळे   भालके यांच्यासाठी पोटनिवडणूक अटीतटीची ठरू शकते.

Exit mobile version