सासर्‍याला पाठीवर बसवून सुनेनं गाठलं रुग्णालय

। गुवाहाटी । वृत्तसंस्था ।

संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे आजवर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या काळात माणूसकीला काळीमा फासणार्‍याही अनेक घटना समोर आल्या. कोरोना झाला म्हणून कुणी आपल्या आप्तांना घराबाहेर काढले, तर कुणी नातलगांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्याक घ्यायलाही नकार दिला. मात्र, सर्वत्र कोरोनाची आशी दहशत असतानाच अथवा भयाचे वातावरण असतानाच, आसाममधून हृदयाला स्पर्शी करून जाणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका सुनेने आपल्या वृद्ध कोरोना बाधित सासर्‍यांना पाठीवर बसून थेट रुग्णालय गाठले. या सुनेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या घटनेचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. 

निहारीका असे या सुनेचे नाव आहे, तर थुलेश्‍वर दास असे त्यांच्या सासर्‍याचे नाव आहे. थुलेश्‍वर दास हे 75 वर्षांचे आहेत. निहारीका याचे पती सुरज हे कामानिमित्त घरापासून दूर राहतात. यामुळे पतीच्या गैरहजेरीत निहारीका याच आपल्या सासर्‍यांची काळजी घेतात. ते भाटीगावच्या राहा येथील रहिवासी आहेत.थुलेश्‍वर दास यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच, निहारीका यांनी मागचा-पुढचा कसलाही विचार न करता, त्यांना आपल्या पाठीवर बसवून उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला आणि रुग्णालय गाठले. निहारिका यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते.

Exit mobile version