रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
|रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
अलिबाग मधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळला.त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.ही घटना मंगळवारी पहाटे सर्जिकल वार्ड मध्ये घडली असल्याची माहिती समोर येत आहे.या घटनेने रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
श्रीवर्धन येथील रुग्णावर गेल्या काही दिवसापासून अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तो बरा झाल्याने मंगळवारी (दि.1) दुपारी त्याला सोडण्यात येणार होते. मात्र पहाटेच्या वेळी निद्रा अवस्थेत असताना अचानक त्याच्या अंगावर स्लॅब कोसळला. रुग्णाच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली.




