। अलिबाग । वार्ताहर ।
वाहन चालकाने भरधाव वेगाने वाहन चालविल्याने रीस येथे झालेल्या अपघातात 1 ठार तर 1 गंभीर जखमी झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रीस येथे अज्ञात आरोपी चालक याने आपल्या ताब्यातील टेलर क्र.एन.एल.01-एल-8020 हा भरधाव वेगात चालवित आणून मारुती सुझुकी ईरटीगा कार क्र.एम.एच.42/ए.एक्स.6589 ला जोराची ठोकर देऊन अपघात झाला आहे. यामध्ये कारचे नुकसान झाले असून एकजण मरण पावला असून फिर्यादी हे सध्या दवाखान्यात उपचार घेत आहेत. याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात 1 ठार तर 1 गंभीर जखमी
