| रोहा | वार्ताहर |
पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन आयवायसी- 2025 अंतर्गत ‘1 पेड माँ के नाम’ या केंद्र शासनाने उपक्रम राबविण्याचे आवाहन केल्यानंतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रोहा, व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, अलिबाग यांचे संयुक्त विदयमाने मेढा विविध कार्यकारी सहकारी संस्था मेढा येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाकरीता सहाय्यक निबंधक मॅडम मा. राखी गावडे व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्मा. संचालक गणेश मढवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाकरीता तालुक्यातील इतर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन व संचालक यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाकरीता विनायक धामणे चेअरमन घोसाळे वि.का. सह. संस्था मर्या. अनंत वाघ चेअरमन कोंडगाव वि.का. सह. संस्था मर्या., काशिनाथ लहाने चेअरमन वाशी बोरघर वि.का. सह. संस्था मर्या. हरिश्चंद्र नारायण खांडेकर चेअरमन मेढा वि.का. सह. संस्था मर्या. व सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका शाखाधिकारी राजेंद्र जंगम, तालुका निरीक्षक लंकेश नागावकर व सहाय्यक तुकाराम शिंदे हे उपस्थित होते. तसेच, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रोहा कार्यालयातील अधिकारी श्रीकांत कावले व मिलींद जोंधळे हेदेखील उपस्थित होते.
या कार्यक्रमाकरीता उपस्थित राहीलेले सर्व पाहुण्यांचे संस्थेचे सचिव लंकेश नागांवकर यांनी आभार मानले.