रायगड जिल्ह्यात 1 हजार 851 रुग्ण; एकाचा मृत्यू

296 कोरोनामुक्त, जिल्ह्यात 8 हजार 039 सक्रीय रुग्ण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात रविवार दि. 9 जानेवारी रोजी कोरोनाच्या 1 हजार 851 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 296 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 8 हजार 039 सक्रीय रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शनिवारी पनवेल महापालिका हद्दीत 1 हजार 303, पनवेल ग्रामीण 170, उरण 12, खालापूर 46, कर्जत 36, पेण 86, अलिबाग 108, मुरुड 2, माणगाव 36, रोहा 17, तळा 2, श्रीवर्धन 8, पोलादपूर 1 तर महाड 24 असे 1 हजार 851 रुग्ण आढळले. सुधागड आणि म्हसळा या दोन तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही.
आता पर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 81 हजार 541 झाली आहे. यापैकी 1 लाख 68 हजार 909 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 596 वर गेला आहे. सद्यस्थितीत 8 हजार 039 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version