अलिबागमध्ये 125 तर पेणमध्ये 142 रुग्ण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवार दि. 12 जानेवारी रोजी कोरोनाच्या 2 हजार 576 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 746 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 12 हजार 101 सक्रीय रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
बुधवारी पनवेल महापालिका हद्दीत 1 हजार 688, पनवेल ग्रामीण 274, उरण 43, खालापूर 79, कर्जत 34, पेण 142, अलिबाग 125, मुरुड 10, माणगाव 58, रोहा 37, तळा 4, सुधागड 2, श्रीवर्धन 4, म्हसळा 3, पोलादपूर 6 तर महाड 67 असे 1 हजार 714 रुग्ण आढळले.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 87 हजार 562 झाली आहे. यापैकी 1 लाख 70 हजार 863 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 598 वर गेला आहे. सद्यस्थितीत 12 हजार 101 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.