राजापूर तालुक्यासाठी 10 कोटींचा पाणीटंचाई आराखडा

गतवर्षाच्या तुलनेत 8 कोटींची बचत
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील राजपूर तालुक्याचा यंदाचा पाणीटंचाई आराखडा हा 10 कोटीचा तयार करण्यात आला असून, यासंदर्भात परिसरात राबविण्यात येणार्‍या जलजीवन मिशनची सकारात्मकेतचा परिणाम आहे. कारण गतवर्षाच्या तुलनेत हा आराखडा 8 कोटी रक्कमेने कमी झाला आहे. एकीकडे जनहितार्थ असणार्‍या शासकीय योजना यशस्वीपणे राबवून त्यातून अपेक्षित परिणाम मिळणे हे वाळवंटातील ओअ‍ॅसिससारखे झाले असताना राजापूर तालुक्यात जलजीवन मिशन या योजनेतून मिळालेले परिणाम आकडेवारीसह प्रत्यक्षातही दिसून आले आहेत.
ही योजना यशस्वीपणे राबवल्याने राजापूर तालुक्याचा संभाव्य टंचाई आराखडा आठ कोटी रुपयांनी कमी झाला आहे. गेल्या वर्षी 18 कोटी रुपये टंचाई आराखडा होता, तो या वर्षी 10 कोटींपर्यंत मर्यादित राहिला आहे. एप्रिल-मे महिन्यामध्ये भासणार्‍या संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाणारा तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये 53 गावांमधील 143 वाड्यांचा समावेश असून सुमारे 10 कोटींचा हा आराखडा तयार केल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. या आराखड्यामध्ये नळपाणी योजना दुरुस्ती, बोअरवेल, विहिरीतील गाळ उपसा आणि दुरुस्ती, नवीन नळपाणी योजना आदी कामांचा समावेश आहे. मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही तालुक्याला दरवर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्याच्या अनुषंगाने येथील पंचायत समितीतर्फे दरवषी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला जातो. त्याप्रमाणे यावर्षीही तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.

Exit mobile version