| रत्नागिरी | वार्ताहर |
शहरालगतच्या चंपक मैदानावर सोमवारी (दि.26) सकाळी एक तरुणी बेशुद्धावस्थेत सापडली आहे. तिच्या अंगावर ओरखडे असल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तेथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत तातडीने तपास सुरू केला आहे.