। अलिबाग । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील तांबडी येथे प्रशांत मुळेकर रा. मानसी फार्म, तांबडी यांच्या मालकीचा 10 हजार रूपयांचा इलेक्ट्रॉनिक व्होल्टेज पंप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत रोहा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून याचा पुढील तपास रोहा पोलिसांमार्फत केला जात आहे.