। अलिबाग । वार्ताहर ।
माणगाव रेल्वे स्टेशनवर दि. 19 ऑक्टोबर दिवा सावंतवाडी रेल्वेने फिर्यादी विलास हुजूर रा.रोहा हे चिपळूणला जात असताना माणगाव रेल्वे स्टेशनवर अज्ञात चोरटयाने त्यांच्या हातातील सॅमसंग कंपनीचा रूपये 15 हजारांचा मोबाईल फोन खेचून स्वतःच्या फायद्यासाठी नेल्याची घटना घडली आहे. याबाबत माणगाव पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखला झाला असून या घटनेतील आरोपीचा पुढील तपास पो.ना.खिरीट हे करीत आहेत.