कांदळेपाडा ग्रामस्थ 100 टक्के करणार मतदान

। पेण । प्रतिनिधी ।

कांदळे ग्रामस्थांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निवेदन उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पेण यांना 12 एप्रिल रोजी देण्यात आला आले होते. 16 एप्रिल रोजी कांदळे ग्रामस्थांसोबत झालेली बैठक राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उपस्थित नसल्याने निष्फळ ठरली होती. परंतु आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकीकरणाचे अधिकारी व्ही.बी.सिंघ, निखिल कुमार, प्रांत अधिकारी प्रविण पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी फडतडे, पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ, आणि सरपंच कादळे, ग्रामस्थ कांदळेपाडा यांच्या उपस्थितीमध्ये तातडीने कांदळेपाडा गावातील सर्विस रोड आणि गटारांच्या कामांची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आणि तातडीने अधिकारी वर्ग घटनास्थळी पोहचून पहाणी केली.

कांदळेपाडा ग्रामस्थांच्या मुख्य मागणीला सरकारने सकारात्मक पाठिंबा दर्शवून कामाला सुरूवात केल्याने हया ग्रामस्थांनी येत्या निवडणुकीत मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असून कांदळे ग्रामस्थ 100 टक्के मतदान करणार असल्याची ग्वाही प्रांताधिकारी प्रविण पवार यांना दिली.

Exit mobile version