आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त 100 रुपयांचे पेट्रोल मोफत

। मुंबई । वार्ताहर ।
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या कर्जत युनिटच्या माध्यमातून कर्जत शहरामधील दहिवली येथील पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल त्यांच्या वाहनात टाकण्यात आले. सर्वसामान्य जनता पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे त्रासलेली आहे. रिलायन्स पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्यामुळे ऐनवेळी मोफत पेट्रोल वाटप कार्यक्रम शहरातील हिंदुस्थान पंपावर 100 रुपयांचे पेट्रोल मोफत टाकण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. त्यावेळी हरीचंद्र यादव, सुनील गायकवाड, सुनील सोनावणे, लोकेश यादव, गणेश मोरे, प्रदिप ढोले, प्रदिप गायकवाड, अशोक कदम, कमलाकर जाधव, रोषण शिंदे, अजय जाधव, जगदीश गायकवाड, शरद गायकवाड आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version