उरणचे १००० हेक्टर कांदळवन क्षेत्र आरक्षित

राज्य सरकारचा निर्णय
| उरण | प्रतिनिधी |

राज्य सरकारने उरण तालुक्यामध्ये एक हजार हेक्टर कांदळवन क्षेत्र आरक्षित करण्यासाठी प्रस्तावित केले आहे. दहा आझाद मैदाने तयार होतील, इतके हे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.

1,4463.2646 हेक्टरच्या या कांदळवन क्षेत्राच्या भागाला रायगड आणि मुंबईच्या उपनगरीय जिल्ह्यांमध्ये आरक्षित वन म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे कांदळवन क्षेत्रातील वनांचा जतन केला जाणारा एकूण भाग 19,479 हेक्टरनी वाढणार आहे. ममहाराष्ट्र मँग्रोव्हज फाऊंडेशनफचे कार्यकारी संचालक विरेंद्र तिवारी यांनी याला सहमती दिली. याबाबतची सूचना राजपत्रात जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले. सरकारचे आभारही मानले. मात्र त्याचबरोबर या परिसरात असलेल्या इतर भागांतील कांदळवनांचेही अशाच प्रकारे आरक्षण करून त्यांनाही संरक्षित करावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

नवी मुंबई सेझ परिसरात सुमारे 1,250 हेक्टर परिसरात हे घनदाट हिरवेगार कांदळवन क्षेत्र असून त्याला अजूनही आरक्षित केले गेलेले नाही, असे मनॅटकनेक्ट फाउंडेशनफचे संचालक बी. एन. कुमार यांनी अधोरेखित केले. नवी मुंबई सेझमध्ये 26 टक्के भागीदार असलेल्या सिडकोने कांदळवने आणि पाणथळ क्षेत्रे या प्रकल्पासाठी वितरित केली आहेत. बर्‍याच दिवसांपासून आम्ही कांदळवने आणि पाणथळ क्षेत्रांना होणार्‍या र्‍हासाबाबत कोणतीही कारवाई केली जात नसल्याची तक्रार करत आहोत. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही, असे कुमार म्हणाले.

पागोटेमध्ये किनारपट्टीच्या रस्त्याच्या एका बाजूला कांदळवनावर पूर्णपणे भराव टाकण्यात आला आहे आणि दुसर्‍या बाजूचे अंशत: नुकसान झाले आहे. काही खारफुटी वनस्पती स्वत:च उगवल्या असल्या, तरी त्यांचा मोठा भाग अजूनही डेब्रिजखाली अडकला आहे. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या कांदळवन क्षेत्र समितीने आदेश देऊनदेखील डेब्रिज काढले गेले नाही. हे समितीच्या आदेशाचे उल्लंघन आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीच्या अधिकाराखालील माहितीनुसार, नवी मुंबई सेझ फेब्रुवारी 2019मध्ये केंद्र सरकारने रद्द केला. तरीदेखील नवी मुंबई सेझच्या नावाखाली प्रकल्पाची कामे सुरू आहेत. पागोटे, भेंडखळ आणि पानजे येथील पर्यावरणदृष्ट्या अतिशय संवेदनशील भाग सिडकोने सेझसाठी वितरित केला, अशी खंत श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी व्यक्त केली.

Exit mobile version