खुशखबर! पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज, पण कधी मिळेल माहित नाही

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातल्या पूरग्रस्त तसंच अतिवृष्टी बाधितांसाठी आता ठाकरे सरकारने मोठी मदत जाहीर केली. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. त्यानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना 10 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत नक्की कधी पोहोचेल हे जरी माहित नसले तरी जाहिर असल्याचा आनंद आहे.

राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 या काळात आलेल्या पूरामुळे तसंच अतिवृष्टीमुळे 55 लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचं नुकसान झालं. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना आपण मदत जाहीर केल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं. जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर,बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर,ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.

Exit mobile version