गाझाला एक लाख इस्रायली सैनिकांचा वेढा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

हमासच्या विरोधात इस्राइलचे युद्ध पेटलेले आहे. त्यातच इस्रायली लष्कर आणि रणगाडे गाझा सीमारेषेजवळ पोहोचले आहेत. कुठल्याही क्षणी सैन्याचे मोहीम सुरु होऊ शकते. इस्रायली लष्कराच्या 1 लाख सैनिकांनी गाझाला वेढा घातला असून इस्रायली रणगाडे गाझाकडे वेगाने सरकू लागले आहेत. इस्रायली सैनिक सरकारच्या आदेशाची वाट बघत आहेत. इस्रायलने हमासला 24 तासांचा अल्टिमेटम दिला असून 24 तासात गाझा सोडण्यास सांगितले आहे. सर्व पाश्चिमात्य देश इस्रायलला पाठिंबा देत आहेत. एवढंच नाही तर युद्धासाठी मदतही करत आहेत. गाझामध्ये हमासचे जेथे तळ आहेत, ते नष्ट केले जातील, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. इस्रायली संरक्षण दलाने गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षिणेकडे जाण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version