| माणगाव | वार्ताहर |
इंग्लिश स्कूलच्या सन 2002 दहावीतील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.17) माणगाव तिलोरे फाटा येथील मुंबई-गोवा महामार्गावरील हॉटेल मानस येथे उत्साहात संपन्न झाला.
22 वर्षांनी एकत्रित येत या विद्यार्थ्यांनी जुन्या, नवीन आठवणींना उजाळा देत जेवणाचा आस्वाद घेत भरपूर मौजमजा केली. 22 वर्षांनी हे सारे विध्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र भेटून त्यांनी आपल्या शाळेतील सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला. काहींनी सध्याच्या नवीन आठवणी या निमित्ताने सांगितल्या. काहींनी शाळेच्या गमती जमती, रुसवे, फुगवे, एकमेकांना केलेली मदत, खेळ आशा अनेक गोष्टींची आठवण करून देत प्रत्येकाच्या चेहर्यावर अतिशय गोड हास्य फुलले होते आणि ते हास्य, तो उत्साह, तो आनंद कायम तसाच राहावा हा मेळाव्याचा उद्देश होता. प्रत्येकाने खरंच खुप मज्जा केली आणि अतिशय सुंदर व सुखद अनुभव घेऊन अशाच आठवणी कायम सोबत रहाव्या यासाठी आपण सर्वानी दरवर्षी एकत्र भेटूया असा संकल्प सर्वानी केला.
या मेळाव्यात माणगाव इंग्लिश स्कुलच्या सन 2002 दहावीतील माजी विध्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांची हॉटेल मानस येथे हॉटेलचे मालक नरेश राजपूत यांनी जातीने लक्ष घालून त्यांना चांगल्या प्रकारे सेवा दिल्याने राजपूत यांचे उपस्थित सर्व विध्यार्थ्यानी मनापासून आभार व्यक्त करीत स्नेह मेळाव्याची उत्साहात सांगता करून पुढील वर्षी पुन्हा भेटण्याचा मनोदय व्यक्त केला.