| पुणे | प्रतिनिधी |
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 11 पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये आठ पोलीस कर्माचरी तर तीन पोलिस अधिकार्यांचा समावेश आहे. चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी शाईफेक केली होती. त्यानंतर मनोज गरबडेसह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटकही केली होती. या तिन्ही आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या घटनेनंतर 11 पोलिसांचं निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यानंतरही पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे. एका पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे. शाई फेकणार्या दोन व्यक्तींसोबत हा पत्रकारही सहभागी झाला होता. ठरवून शाई फेकीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.