। मुरूड जंजिरा । प्रकाश सद्रे ।
मुरूडचा ऐतिहासिक प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची तिपटीने वाढ झाली असून रायगडात आल्यानंतर पर्यटक येथे हमखास भेट देतात. पर्यटकांना सुलभतेने जंजिऱ्यात जाता यावे यासाठी राज्य सरकारने सागरमला प्रकल्पाअंतर्गत 111 कोटी 41 लाख रुपयांची जेट्टी जंजिऱ्याजवळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या भरीव निधीस तात्काळ मान्यता देण्यात आली असून पुरातत्व खाते आणि केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर या कामाचे टेंडर निघणार आहे. त्यामुळे जंजिऱ्याला आधिक चांगले दिवस येणार हे निश्चित झाले आहे.
होडीतून जंजिऱ्याजवळ पोहचले की, अनेकवेळा पर्यटकांना किल्ल्यावर उतरणे जिकरीचे होत असे. समुद्राच्या लाटांमुळे हेलकावे बसल्यामुळे अपघाताची शक्यता होती. विशेष करून वृद्ध आणि छोट्या मुलांचे अतोनात हाल होत असत. याबाबत एकूणच अभ्यास करून मेरिटाइम बोर्डाने जेट्टी बाबतचा प्रस्ताव सागरमाला प्रकल्पाअंतर्गत राज्य शासनाकडे मान्यतेसाठी सादर केला होता. त्यानुसार राज्य शासनाच्या पर्यटन खात्याने पर्यटन वृद्धीबाबत आणि एकूण परिस्थितीचा विचार करून 111 कोटी 41 लाख किमतीच्या भरीव निधीस तात्काळ मान्यता दिली आहे.
जंजिरा किल्यावर होणार 111.41 कोटींची सुसज्ज जेट्टी
