अलिबाग तालुक्यात 112 नवे रुग्ण

74 कोरोनामुक्त
अलिबाग विशेष प्रतिनिधी
अलिबाग तालक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच असून शुक्रवारी 18 जून रोजी अलिबाग तालुक्यात तब्बल 112 नव्या रुग्णांची नोंद झाली. सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याने दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात 74 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 264 झाली आहे. यापैकी 432 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 13 हजार 600 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 232 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version