12 आमदार नियुक्तीचा तिढा सुटतोय?

न्यायालयाची संतुलित पण स्पष्ट भूमिका
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्यपालांना आदेश देता येणार नाहीत असं स्पष्ट करतानाच राज्यपालांना देखील मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्‍चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यपाल काय भूमिका घेतात, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या प्रश्‍नावर न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकांवर मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने निकालपत्र जाहीर केले. नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते रतन सोली यांनी एड एस्पी चिनौय यांच्यामार्फत ही याचिका केली आहे.

Exit mobile version