पेण | प्रतिनिधी |
पेण शहरातील कुंभार आळी मधील सदगुरु पार्क सोसायटी या ईमारतीच्या टेरेसवरून पडून १२ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (आज) बुधवार रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली असून साईश विशाल नाईक असे मृत झालेल्या मुलाचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पेण येथिल उपजिल्हा रुग्णालय येथे मुलाला उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी सदर मुलगा मृत झाल्याचे घोषीत केले. या घटनेचा अधिक तपास पेण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शिंदे करत आहे. पेण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.