बारावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून उपलब्ध, डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता बारावीच्या मार्च- एप्रिल २०२२ परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून ( ९ फेब्रुवारी २०२२ ) पासून उपलब्ध होणार आहे. हॉलतिकीट दुपारी १ वाजल्यापासून उपलब्ध होईल. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ तर लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च २०२२ रोजी होणार आहे.

कसं डाऊनलोड करायचं हॉलतिकीट ?
विद्यार्थांना हॉलतिकीट http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर कॉलेज लॉगइन मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील.

हॉल तिकीट २०२२ डाउनलोड करण्यासाठी स्टेप्स
१. सर्वप्रथम महा एसएससी बोर्डाची वेबसाइट http://www.mahahsscboard.in उघडा.

२. आता अपडेट्स विभागात ‘ डाउनलोड महाराष्ट्र एचएससी हॉल तिकीट २०२२ लिंक’ वर जा.

२. त्यानंतर महा एसएससी १०वी हॉल तिकीट २०२२ किंवा महा एचएससी १२वी हॉल तिकीट २०२२ यापैकी निवडा.

३. तुमचा महा एचएससी हॉल तिकीट २०२२ पाहण्यासाठी तुमचा रोल नंबर किंवा नाव किंवा नोंदणी क्रमांक जन्मतारीखं टाकून एंटर करा.

४. त्यानंतर महाराष्ट्र बोर्ड हॉल तिकीट २०२२ डाउनलोड करा.

दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी सोमवारी म्हणजेच ३१ जानेवारी २०२२ रोजी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक निदर्शनांंनतर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा ऑफलाइनच होतील असं स्पष्ट केलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य होणार नाही असं सांगितलं आहे. तसेच यामागील कारणांचा खुलासाही शिक्षण मंडळाकडून करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा उपलब्ध करुन देता येणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

Exit mobile version