प्राथमिक 9, तर माध्यमिकच्या 4 शाळांचा समावेश
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यात 13 प्राथमिक ग्रामीण आणि माध्यमिक ग्रामीण शाळांची यादी पंचायत समिती पनवेल शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे. करंजाडे परिसराचा झपाट्याने विकास होत असल्याने या परिसरात अनधिकृत शाळांची संख्या जास्त आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाची कोणतीही परवानगी/मान्यता न घेता या शाळा सुरू केलेल्या आहेत. या शाळांना शासनाची मान्यता नाही. त्यामुळे या शाळा अनधिकृत शाळा असल्याचे पंचायत समिती पनवेल या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. पालकांनी या शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सीताराम मोहिते यांनी केले आहे.
अनधिकृत प्राथमिक शाळा
1)आकृती एज्युकेशन अँड वेलफेअर सीएसएमबी इंटरनॅशनल स्कूल, उलवे, 2) न्यु इंग्लिश स्कुल, नेरे, 3) किड्स गार्डन पब्लिक स्कूल, टेमघर, 4) एस.जी.टी. इंटरनॅशनल करंजाडे, आर 1, 5) साईगणेश एज्युकेशन सोसायटी नवजीवन इंटरनॅशनल स्कूल, खारपाडा, 6) वेदिक ट्री इंटरनॅशनल स्कूल, करंजाडे सेक्टर 3, 7) वेदगृह इंटरनॅशनल स्कूल, करंजाडे सेक्टर 4, 8) दि बुध्दीष्ट इंटरनॅशनल स्कूल, ओवळे, 9)सनराईस इंग्लिश स्कूल, वावंजे.
अनधिकृत माध्यमिक शाळा
1) दि बुध्दीष्ट इंटरनॅशनल स्कूल, आर 1, करंजाडे, 2) कै. मंजुळा त्रिंबक (साखरेशेठ) ठाकूर इंग्रजी माध्यम शाळा-पाले ब्रुदुक कोळवाडी, 3) ज्ञानाई माध्यमिक विदयालय धामणी-वाजे, 4) न्यु इंग्लिश स्कूल कोपरा.