। काबूल । वृत्तसंस्था ।
इस्लामिक स्टेट ऑफ खोरासनने काबुलमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली. जवळपास 200 जण या बॉम्बस्फोटात ठार झाले आहेत. यात 13 अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. काबुलमध्ये झालेला हा बॉम्बस्फोट भारतासाठी सुद्धा धोक्याची घंटा आहे. कारण केरळचे 14 रहिवाशी या इस्लामिक स्टेट ऑफ खोरासनसाठी काम करत असल्याची माहिती आहे.
तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवताच बागराम जेलमधून या 14 जणांना मुक्त केलं आहे. 26 ऑगस्टला काबुलमधील तुर्कमेनिस्तानच्या दूतावासाबाहेरही स्फोट घडवण्याचा प्रयत्न झाला. पण ते अयशस्वी ठरले. या संबंधात दोन पाकिस्तानीना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पण या वृत्तावर अजून अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.