| काबूल | वृत्तसंस्था |
पंजशीर जिंकल्याच्या आनंदामध्ये तालिबानने शुक्रवारी रात्री काबुलमध्ये हवेत गोळीबार केला. तालिबानने केलेल्या या सेलिब्रेशन फायरिंगची किंमत अनेक निष्पाप जीवांना चुकवावी लागली आहे. तालिबानने हवेत केलेल्या या गोळीबारामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक जण जखमी सुद्धा झाले आहेत.फअस्वाकाफ या स्थानिक अफगाण वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. तालिबानने पंजशीऱ खोर्यावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केल्यानंतर काबुलमध्ये शुक्रवारी हवेत गोळ्यांच्या फैरी झाडल्याचे आवाज ऐकू आले. पंजशीर खोर्यात नॅशनल रेसिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये घनघोर लढाई सुरु आहे. पंजशीर जिंकल्याचा तालिबानचा हा दावा NRF – फोर्सने फेटाळून लावलाय. हवेतील गोळीबाराच्या या घटनेनंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटो, व्हिडीओमध्ये नागरिक त्यांच्या जखमी नातेवाईकांना काबुलच्या रुग्णालयात घेऊन जात असल्याचे दिसत आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलेय.