| बीड | वार्ताहर |
उस्मानाबाद जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 27.63 कोटी रुपयांच्या साखर कारखान्याच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रमुख अधिकार्याला अटक केली आहे. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळेंना अटक करण्यात आली आहे. आरोपीला शुक्रवारी कळंब येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वैद्यनाथ अर्बन बँकेवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं वर्चस्व आहे.