जिल्हा पशुधन अधिकारी यांच्याकडून चौकशीचे आदेश
| नेरळ | प्रतिनिधी |
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा केला जात असून शासकीय आस्थापना असलेली कार्यालये यांच्या ठिकाणी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकावला पाहिजे अशा शासनाच्या सूचना होत्या. मात्र कर्जत तालुक्यातील तब्बल 14 पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या ठिकाणी आज 15 ऑगस्ट रोजी देखील तिरंगा झेंडा फडकवला नाही. दरम्यान,या प्रकरणी तालुका पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी यांच्या आहवालानंतर जिल्हा पशुधन अधिकारी डॉ शाम कदम यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
आपल्या देशाचा अमृत महोत्सव निमित्त देशातील प्रत्येक घरावर नागरिकांनी तिरंगा ध्वज फडकवला आहे. शासनाच्या हर घर झेंडा… हर घर तिरंगा या अभियानात सरकारी आस्थापना यांना 13 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकावणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानूसार बहुतेक सर्व शासकीय कार्यालये यांच्या ठिकाणी तिरंगा सकाळी फडकावून सायंकाळी उतरविण्यात आले. 13 ऑगस्ट ते 15रोजी संपुर्ण भारत हर घर तिरंगाचा जयजयकार चालू असतांना सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालये या सामिल होऊन मोठ्या उत्साहात साजरा करतांना दिसत होते यात सामन्य नागरीकनी देखील मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करताना दिसून येत होता. कर्जत तालुक्यात 16 पशुवैद्यकीय दवाखाने असून त्या त्या ठिकाणी शासनाच्या निर्देशाप्रमाणे ध्वजारोहण होणे अपेक्षित होते. मात्र तालुक्यातील तब्बल 14 पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या इमारती बाहेर तिरंगा ध्वज फडकले नाहीत.
13 आणि 14 ऑगस्ट रोजी त्या कार्यालयाच्या ठिकाणीं तिरंगा ध्वज सन्मानूर्वक फडाकवणे बंधकारक असताना त्या दोन दिवशी आणि आज देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी देखील तिरंगा फडकला नाही. अशी धक्कादायक माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर चंदने यांनी समोर आणली आहे. तालुक्यातील कोंडीवडे आणि कशेले या दोनच पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या कार्यालयाबाहेर तिरंगा फडकवला नाही.याबाबत त्यांना चांदणे यांना माथेरान मधील पशुवैद्यकीय दवाखाना येथील परिस्थिती पाहून तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने यांचा आढाव घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
त्यानंतर चंदने यांनी तालुका पशुधन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने यांची ध्वजारोहण बद्दल माहिती घेण्यात आली असता तब्बल 12 कार्यालयाबाहेर ध्वजारोहण झाले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जत पंचायत समितीचे पशुवैद्यकीय विभाग चे विस्तार अधिकारी यादव यांनी ध्वजारोहण न झालेल्या कार्यालयांचा अहवाल जिल्हा पशुधन अधिकारी यांना पाठविण्यात आल्यानंतर या प्रकारच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
माथेरान मध्ये असलेल्या पशवैदकिय दवाखानात गेल्या कित्येक दिवसांपासून येथील पशवैदकिय अधिकारी डॉ अमोल कांबळे हे फिरकलेच नाही. 11 ऑगस्ट ला सर्व शासकीय कार्याल स्वच्छ करण्याचे आदेश असताना त्या कार्यालयाकडे कोणी अधिकारी फिरकला नाही. त्यात माथेरान मध्ये असलेल्या 450 घोडे यांच्या आरोग्याचा प्रश्न कायम असताना माथेरान मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी गायब आहेत.त्यामुळे 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत त्या कार्यालयाबाहेर ध्वजारोहण झाले नाही.
दिगंबर चंदने
.
ज्या पशवैदकिय दवाखानात हर हर तिरंगा अभियान राबविले गेले नसेल तसेच झेंडा फङकवला गेला नसेल, त्या ठिकाणी जबाबदार असलेल्या सर्व अधिकारी यांच्यावर शासन निर्णयानुसार कारवाई केली जाईल.
डॉ.शाम कदम.. जिल्हा पशुधन अधिकारी