14 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

। माणगाव । सलीम शेख ।
माणगाव तालुक्यातील वाकी निजामपूर आदिवासीवाडी येथील 14 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी (दि.14) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती सुभाष नामदेव जाधव (वय-42) रा.वाकी निजामपूर आदिवासीवाडी ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

अश्‍विनी सुभाष जाधव (वय-14) रा.वाकी आदिवासीवाडी या मुलीने आपल्या राहत्या घराच्या भालाला ओढणीने गळफास घेतला. हे पाहून फिर्यादी सुभाष जाधव यांनी तिच्या गळ्याची ओढणी सोडून मुलीला उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version