रायगड जिल्ह्यात 142 रुग्ण

9 जणांचा मृत्यू तर 108 कोरोनामुक्त

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज बुधपवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी नव्याने 142 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 108 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
बुधवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 46, पनवेल ग्रामीण 17, उरण 1, खालापूर 2, कर्जत 14, पेण 6, अलिबाग 27, मुरुड 1, माणगाव 6, रोहा 5, सुधागड 4, श्रीवर्धन 3, म्हसळा 3, महाड 6 आणि पोलादपूर 1 असे एकूण 142 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर तळा तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. त्याचप्रमाणे तर पनवेल ग्रामीणमध्ये 4, महाड येथे 2, तसेच मुरुड, श्रीवर्धन, आणि पोलादपूर या तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 105 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 58 हजार 443 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 145 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 517 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version