रायगड जिल्ह्यात 147 नवे कोरोना रुग्ण

7 जणांचा मृत्यू तर 246 झाले कोरोनामुक्त

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी नव्याने 147 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 246 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
गुरूवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 38, पनवेल ग्रामीण 18, उरण 5, खालापूर 5, कर्जत 3, पेण 7, अलिबाग 25, माणगाव 5, तळा 1, रोहा 10, सुधागड 10, श्रीवर्धन 2, म्हसळा 4, महाड 12, पोलादपूर 2 असे एकूण 147 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर मुरुड तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तसेच अलिबाग तालुक्यात 3, पनवेल मनपा क्षेत्रात 2 तर खालापूर, म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 62 हजार 371 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 56 हजार 257 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 079 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 2 हजार 035 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version