रोजगार हमीतील 15 हजार कामे अपूर्ण

| अलिबाग | माधवी सावंत |

शासनाकडून स्थानिक पातळीवर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी या कामासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येतो. मात्र गेल्या पाच वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या 47 हजार 447 कामांपैकी 15 हजार 480 कामे अपूर्णावस्थेत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील रस्ते, जलसंवर्धन, सिंचन विहिरी, लहान पाट यासह वृक्षारोपण, रोपवाटिका आदी कामांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे 2020-21 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी 4732 कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. रोजगार हमी योजनेतील कामांचा आढावा घेतला असता ही कामे कासवगतीने होत असल्याची बाब उघड झाली. इतक्या मोठ्या प्रमाणावर कामे अपूर्ण असल्याने योजनेचा मूळ हेतूच साध्य होत नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय जिल्ह्याच्या विकासातही अडथळा निर्माण झाला आहे. योजनेसाठी खर्च करण्यात येणारा कोट्यवधी रुपयांचा निधीही वाया जात आहे. कामे अपूर्ण असल्याने त्याचा लाभ नागरिकांनाही होऊ शकत नाही. रोजगार हमी योजनेच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची असते ; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच कामाला विलंब झाला असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिने कोणत्याही परिस्थितीत ती कामे पूर्ण होणे आवश्यक आहे.

कर्जत सर्वाधिक तर मुरुडमध्ये सर्वात कमी कामे मंजूर
रोजगार हमी योजने अंतर्गत गेल्या पाच वर्षात सर्वाधिक कर्जत तालुक्यात 5105 कामांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी 1705 कामे अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याचे समोर आले आहे. तर जिल्ह्यात मुरुड तालुक्यात सर्वात कती 1459 कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी 442 कामे अद्यापही अपूर्ण आहेत.
पोलादपूर दुर्लक्षित
या योजने अंतर्गत पोलादपूर तालुक्यात 2768 कामे मंजूर करण्यात आली असून केवळ 51.7 टक्के म्हणजेच केवळ 1431 कामे आजपर्यंत पूर्ण झाली आहेत, तर 1337 कामे अपूर्ण आहेत.
तळा, श्रीवर्धन तालुक्यावर विशेष भर
रायगड जिल्ह्यात तटकरे कुटूंबियांनी आपल्या मतदार संघात कायमच अनेक योजना नेण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार असूनही आपल्या लेकरांच्या मतदार संघाकडे खासदार सुनिल तटकरे यांनी विशेष लक्ष ठेवले आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील 76 टक्के तर तळा तालुक्यातील 78 टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
आमदार साहेब लक्ष असू द्या!
अलिबाग, रोहा, मुरुड या तालुक्यात गेल्या 5 वर्षात 8969 कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी 2603 कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यामुळे आमदार साहेब राजकारणाबरोबरच समाजकारणही करुन, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करा, अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुकागेल्या 5 वर्षातील कामेपूर्ण कामेअपूर्ण कामेटक्केवारी
अलिबाग3071216390870.43
कर्जत51053400170566.6
खालापूर27971787101063.89
महाड34581948151056.33
माणगाव45403133140769.01
म्हसळा2164148767768.72
मुरुड1459101744269.71
पनवेल41063042106474.09
पेण50893592149770.58
पोलादपूर27681431133751.7
रोहा44363183125371.75
श्रीवर्धन1999152147876.09
सुधागड30991993110664.31
तळा1834143440078.19
उरण152283668654.93
Exit mobile version