माणगाव बसस्थानकातील काँक्रिटीकरणावर 16 लाख खर्च

खड्डेमुक्त आवारासाठी आणखी लागणार न

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव बसस्थानकातील कॉक्रिटीकरणासाठी तब्बल 16 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र तरीही अद्याप या स्थानकातील उर्वरित कामे अपुरीच राहिलेली आहेत. त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, अशी विचारणा सर्वसामान्यांतून केली जात आहे.

माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांशी सामना करीत होते. एसटी महामंडळाचे प्रशासन डोळेझाक करीत होते. नागरिकांची समस्या लक्षात घेता माणगाव तालुका शिवसेना युवासेना द. रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांचे नेतृवाखाली बसस्थानकातील पडलेल्या खड्यातील पाण्यात उभे राहून युवा सैनिक व शिवसेना पदाधिकारी यांनी आंदोलन छेडले होते. ही मागणी आ. भरत गोगावले यांच्याकडे केली होती. त्यानुसार आ. गोगावले यांनी राज्य परिवहन महामंडळाचे संबंधित अधिकार्‍यांकडे या मागणीचा पाठपुरावा करून बसस्थानकातील प्रवेशद्वाराजवळ 16 लाख रुपये कॉक्रिटीकरणाचे काम मंजूर करुन घेतले. ते काम एका ठेकेदारामार्फत करण्यात आले. मात्र उर्वरित बसस्थानक आवार खड्डेमुक्त करण्यासाठी आणखी निधीची गरज भासत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास प्रवाशांना पावसाळ्यात चिखलातून पायपीट करावी लागणार आहे. या कामासाठी पुढचे पाऊल कधी ? असा सवाल प्रवासी नागरिक करीत आहेत.

माणगाव बसस्थानक आवारात कॉक्रिटीकरण संपूर्ण करणे गरजेचे असताना कांही बस कॉक्रीटीकरण झालेल्या फ्लॅटफॉर्मवर उभ्या केल्या जातात तर कांही बस कॉक्रिटीकरणबाजुला उभ्या केल्या जातात. त्यामुळे कॉक्रिटीकरण झालेल्या भाग उंच व न झालेला भाग खड्ड्यात अशी स्थिती आहे. त्यामुळे उर्वरित बसस्थानक आवारातील कॉक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. ते पावसाळ्यापूर्वी न झाल्यास बस स्थानक आवारातील आर्धा भाग चिखलात राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. नजीकच्या काळात हे काम सुरु न प्रवासी नागरिकांना बसस्थानकात जाने व येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गेली अनेक दिवस माणगाव बस स्थानकातील खड्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नात आ. भरत गोगावले, रा.प.मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता, रायगड विभाग नियंत्रक, कनिष्ठ अभियंता, माणगाव आगार व्यवस्थापक यांनी उर्वरित लागणारा निधी मंजूर करून हे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरीकातून होत आहे. महाड, माणगाव, पोलादपूर विधानसभा आ. भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून बस स्थानक आवारातील कॉक्रिटीकरणासाठी निधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून 16 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यांचे काम संबंधित ठेकेदारामार्फत झाले. मात्र हा निधी अपुरा असल्याने उर्वरित संपूर्ण बसस्थानक आवारात कॉक्रीटीकरण करण्यासाठी आणखी निधीची गरज आहे. या निधीसाठी आपण आ. गोगावले साहेबांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार आहोत. तसेच बसस्थानक आवारात पाणपोईसाठी दानशूरांच्या सहभागातून उभारण्यात येणार आहे.

Exit mobile version