चकमकीत तीन जवान शहीद
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
छत्तीसगडच्या बिजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. या चकमकीत 16 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. छत्तीसगड राज्यातील बिजापूर गंगानूर येथील जंगलातील घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ही चकमक चालली. यात चकमकीत 16 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. चकमकीत तीन पोलीस जवान शहीद झाले होते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलिसांनी 12 माओवादी यांचे मृतदेह सापडले आहे. त्यानंतर पहाटे शोधमोहीम राबविण्यात आली. त्यात चार माओवाद्यांचे मृतदेह आढळले. या चकमकीत 20 ते 22 माओवादी ठार झाले असावे, असा पोलीस दलाचा अंदाज आहे.
आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात आले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाकडून या भागात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. बिजापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत डीआरजी दंतेवाडा-बिजापूर, एसटीएफ कोबराच्या संयुक्त पथकाकडून ऑपरेशन सुरु केले. अद्यापही चकमक सुरूच असल्याची माहिती त्यांनी दिली.
या ठिकाणी एसएलआर, 303 रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारुगोळा जप्त केला. मृत माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलातील बिजापूरचे प्रमुख मोनू वडाडी आणि दुकारु गोंडे हे शहीद झाले. तर जखमी जवान सोमदेव यादव यांच्यावर उपचार सुरू आहे. चकमक सुरूच असल्याने सुरक्षा दलाने अतिरिक्त कुमक पाठवली आहे.
