15 कोरोनामुक्त, जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरुवार दि. 16 डिसेेंबर रोजी कोरोनाच्या 16 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याने दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात 15 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
गुरुवारी पनवेल महापालिका हद्दीत 7, पनवेल ग्रामीण 1, उरण 1, पेण 2, अलिबाग 4, माणगाव 1 असे 16 रुग्ण आढळले. तसेच खालापूर कर्जत, रोहा, मुरुड, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर या 10 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 72 हजार 369 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 579 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 580 वर गेला आहे. सद्यस्थितीत 210 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.