युक्रेनमधील 16 विद्यार्थी रायगडात दाखल


। अलिबाग । भारत रांजणकर ।
वैद्यकीय शिक्षणासाठी युुक्रेनमध्ये वास्तव्यास असलेले रायगडातील 16 विद्यार्थी सुखरुपपणे मायदेशी दाखल झालेले आहे.पाल्य सुखरुप आल्याने पालकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे या सर्वांना ऑपरेशन गंगा माध्यमातून मायदेशी आणले जात आहे.जिल्ह्यातील 32 विद्यार्थी तेथे अडकून पडलेले होते. त्यापैकी 16 जण दाखल झालेले आहेत.तर अन्य विद्यार्थी येण्याच्या मार्गावर आहेत. दाखल झालेल्यांमध्ये नहूश गायकवाड (नागोठणे), आर्यन पाटील(पेण). अभिजीत थोरात (खोपोली) ,साहित म्हामूणकर (लाडिवली), पूर्वा पाटील(धेरंड),यश काळबेरे(तळा),प्रेरणा धिंगे(पेण),अद्वैत कैलास गाडेे( पनवेल),प्रचिती दीपक पवार(करंजाडे) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Exit mobile version