चंद्रपूरात वन्यप्राण्याने १६ वर्षीय मुलाला उचलून नेले; २४ तासांतील सलग दुसरी घटना

वन खात्यात एकच खळबळ
। मुंबई । वृत्तसंस्था ।
चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपूर महाऔषणीक केंद्राच्या समोर असलेल्या दुर्गापूर नेरी येथे अल्पवयीन मुलाला वन्यप्राण्याने उचलून नेले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भाडके या अल्पवयीन मुलाला वन्य प्राण्याने उचलून नेल्याने खळबळ उडाली आहे. हा मुलगा दुर्गापूर वॉर्ड नंबर १ मध्ये आदिवासी आश्रम शाळेच्या मागील परिसरात राहत होता. याच परिसरात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
हा वन्य प्राणी वाघ आहे की बिबट्या याचा अद्याप शोध लागलेला नाही. चंद्रपूर वीज केंद्रात काल बुधवारी रात्री भोजराज मेश्राम या कामगाराला उचलून नेले होते. त्यानंतर गुरुवारी पहाटे त्याचा मृतदेह मिळाला होता. त्यानंतर चोवीस तासातील ही दुसरी घटना आहे. वन विभाग मुलाचा शोध घेत आहे.

Exit mobile version