| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात नव्या कोरोना बाधितांच्या दैनंदिन संसर्ग दरात वाढ नोंदवण्यात आली असून देशाचा दैनंदिन संसर्ग दर 4.14 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. तर, गेल्या 24 चोवीस तासांत 17,092 नव्या कोराना बाधितांची नोंद करण्यात आली असून, 29 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशासह नागरिकांच्या चिंते भर पडली आहे. तर, 14,684 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 1,09,568 इतके सक्रिय रुग्ण आहे. देशातील साप्ताहिक संसर्ग दर 3.56 टक्के नोंदवला गेला असून मृत्युदर 1.21 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. दुसरीकडे देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड लसीचे 197.84 कोटी डोस देण्यात आले आहेत.