रायगड जिल्ह्यात 19 रुग्ण; 1 मृत्यू

14 कोरोनामुक्त, 11 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सोमवार दि. 22 नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या 19 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल 14 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच 11 तालुक्यांमध्ये नव्याने एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सोमवारी पनवेल महापालिका हद्दीत 8, पनवेल ग्रामीण 6, खालापूर 2, अलिबाग 2, महाड 2 असे एकूण 19 रुग्ण आढळले. तसेच उरण, मुरुड, कर्जत, पेण, रोहा, माणगाव, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, आणि पोलादपूर या 11 तालुक्यांमध्ये आज एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 837 झाली आहे. यापैकी 1 लाख 67 हजार 050 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 570 वर गेला आहे. सद्यस्थितीत 217 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version