जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या महाराष्ट्राच्या 19 तायक्वांदोपट्टूचा सन्मान

रसायनी, वार्ताहर


जागतिक कॅडेट व ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा तसेच आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील रायगड, नवी मुंबई व इतर भागातील 19 खेळाडूंचा सत्कार सोहळा इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेतर्फे या सत्कार सोहळ्याचे आयोजन पुणे शहरात हॉटेल श्रेयस, डेक्कन जिमखाना येथे करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, समन्वयक किराश बेहरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास ‌‘ताम’चे अध्यक्ष अनिल झोडगे, सरचिटणीस संदीप ओंबासे, खजिनदार डॉ. प्रसाद कुलकर्णी, सीईओ गफार पठाण, तुषार आवटे, कमलेश मोतीवाला, भास्कर करकेरा, सुरेश चौधरी, शिवाजी चव्हाण, प्रमोद दौंडे, उषा शिर्के, पंडित शेळके, कांबळे, सचिन माळी, राहुल कोते, सुरेश आव्हाड, मनोज इंगळे, असिम सिंग सोधी, नारायण कराळे, तुषार सिनलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राचे 19 तायक्वांदो खेळाडू प्रथमच जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यानिमित्ताने त्यांचा सन्मान करण्यात आला. यात राज जाधव, ध्रुव शेट्टी, साई जाधव, किरण कदम, निशिता पाडेकर, संस्कृती पाटील, स्वयम चव्हाण, अक्षरा शानबाग, श्रावणी तेली, रुद्र खंडारे, कियान देसाई, आर्यन सरकार, धनश्री पवार, सिद्धी बेंडाळे, स्वाहिली दळवी, स्वरुप रेडेकर, प्रिशा शेट्टी या खेळाडूंचा सत्कार इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

Exit mobile version