जिल्ह्यात 190 नवे कोरोना रुग्ण

13 जणांचा मृत्यू तर 340 कोरोनामुक्त

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज मंगळवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी नव्याने 190 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळा आणि पोलादपूर तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. तर 340 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
मंगळवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 66, पनवेल ग्रामीण 28, उरण 7, खालापूर 11, कर्जत 7, पेण 7, अलिबाग 29, माणगाव 9, मुरुड 2, श्रीवर्धन 1, रोहा 8, म्हसळा 1, सुधागड 5, महाड 9 असे 190 रुग्ण आढळले. तर तळा, व पोलादपूर तालुक्यात आज एकाही नविन रुग्णाची नोंद झाली नाही.
तसेच खालापूर 4, रोहा 3, पेन अलिबाग तालुक्यात प्रत्येकी 2, तर पनवेल मनपा, सुधागड तालुक्यामध्ये प्रत्येकी एक अशा 13 रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 60 हजार 766 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 54 हजार 082 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 003 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 2 हजार 681 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version