1983 विश्‍वचषकाचा हिरो कालवश

हृदयविकाराच्या झटक्याने यशपाल शर्मांचे निधन
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण असणारा 1983 विश्‍वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेले माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन झाले आहे. मंगळवारी (13 जुलै) सकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने शर्मा यांचे निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. भारताकडून 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळलेल्या शर्मा यांनी टेस्टमध्ये दोन शतकांच्या मदतीने 1606 रन्स बनवले होते. तर, वन-डे क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 89 रन्स आहेत. पण, 1983 च्या विश्‍वचषकात त्यांनी खेळलेले काही सामने हे आजही सर्वांच्या स्मरणात आहेत आणि त्यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळेच भारत विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचू शकला होता.

यशपाल शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरोधात सियालकोट येथील एकदिवसीय सामन्यात 1978 मध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर त्यांनी पहिली टेस्ट इंग्लंड विरोधात क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणार्‍या लॉर्ड्स मैदानावर खेळली होती. शर्मा यांनी 1985 मध्ये इंग्लंडविरोधात चंदीगढ़ येथे शेवटची वन-डे खेळली होती. तर, वेस्टइंडीज विरोधात दिल्ली येथे 1983 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

1983 विश्‍वचषकाचा हिरो
1983 च्या विश्‍वचषकात यशपाल यांनी कामगिरी वाखाणण्याजोगी होती. वेस्टइंडीज विरोधातील पहिल्याच सामन्यात त्यांनी 89 धावंची दमदार खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधातही 40 धावंची महत्त्वाची खेळी करणार्‍या यशपाल यांनी सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरोधात 61 धावांची खेळी करुन सामना जिंकवून दिला होता.

Exit mobile version